भिगवण - भिगवण येथील गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली. संबंधित तरुणीने इंदापूरन्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहून आई व मामाकडे जाण्याची स्पष्ट इच्छा व्यक्त केली. तिच्या या जबाबामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुलगी मागील पाच दिवसांपासून सुधारगृहात होती. आज इंदापूरन्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी तिला थेट विचारणा केली की, “तुला कोणासोबत राहायचे आहे?” यावर तिने कोणतीही दबाव नसल्याचे सांगत आई व मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. आनंद देशपांडे यांनी वकीलपत्र दाखल केले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ संदर्भात आजची सुनावणी महत्त्वाची ठरली. न्यायालयाने मुलीची संमती नोंदवून तिच्या इच्छेनुसार पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचा अधिकृत आदेश सुधारगृह प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर संबंधित तरुणीला आई व मामाच्या ताब्यात देण्याची कार्यवाही होणार आहे.
Web Summary : The Bhigwan case took a turn as the girl expressed her wish to live with her mother and uncle before the Indapur court via video conference. The court will send the order to the rehabilitation center. The accused has been moved to an undisclosed location.
Web Summary : भिगवन मामले में नया मोड़ आया है क्योंकि लड़की ने वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से इंदापूर अदालत के सामने अपनी माँ और चाचा के साथ रहने की इच्छा व्यक्त की। अदालत सुधार गृह को आदेश भेजेगी। आरोपी को अज्ञात स्थान पर ले जाया गया है।