दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या तीन सराईतांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:37 IST2025-10-07T17:36:59+5:302025-10-07T17:37:12+5:30
याप्रकरणी वाघोली पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू होता. पोलिस अंमलदार प्रदीप मोटे यांना आरोपी खराडी व दापोडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या तीन सराईतांना अटक
पुणे : गप्पा मारत असताना झालेल्या बाचाबाचीतून मित्राचा दगडाने ठेचून व हत्याराने वार करून खून करणाऱ्या तीन सराईतांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय बाबू पटेल (२४ , रा. लेन नं. १२, आपले घर सोसायटी, खराडी), मयूर रामकिसन वडमारे (२२, रा. खुळेवाडी, चंदननगर), प्रदीप रघुनाथ जाधव (२३, रा. लेन नं. ८, आपले घर सोसायटी, खराडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर बादल शेख असे खून झालेल्या त्यांच्या मित्राचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बादल शेख व त्याचे मित्र रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास उबाळे नगर येथील एका लॉजच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यातून अक्षय पटेल, मयूर वडमारे व प्रदीप जाधव यांनी बादल शेख याला दगड व धारदार हत्याराने वार करत त्याचा खून केला आणि तिघेही पसार झाले.
याप्रकरणी वाघोली पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू होता. पोलिस अंमलदार प्रदीप मोटे यांना आरोपी खराडी व दापोडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४चे पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे, येरवडा विभागाचे सहा. पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे, तपास पथक पोलिस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलिस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे व गहिनीनाथ बोयणे यांच्या पथकाने केली.