लोणावळ्यात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा;२२ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:20 IST2026-03-22T14:19:10+5:302026-03-22T14:20:37+5:30

याप्रकरणी बंगल्याचा मालक आणि जुगार खेळणाऱ्यांसह एकूण २२ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime news raid on high-profile gambling den in Lonavala; 22 people booked | लोणावळ्यात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा;२२ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळ्यात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा;२२ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा शहरातील कुणेनामा परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि आलिशान गाड्यांसह एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बंगल्याचा मालक आणि जुगार खेळणाऱ्यांसह एकूण २२ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २१ मार्च रोजी पहाटे ४:४० वाजण्याच्या सुमारास कुणेनामा (ता. मावळ) येथील बंगल्यात ही कारवाई करण्यात आली. करण पाटील याने हा बंगला मालक हनुमंत एकनाथ थोरबोले (रा. आरके हॉटेलशेजारी, वरसोली टोलनाका, ता. मावळ) याच्याकडून ६० हजार रुपये भाड्याने घेतला होता व तेथे हा जुगार अड्डा चालवला जात होता. पोलिसांनी छापा टाकला असता बंगल्यात दोन टेबलांवर ‘फ्लॅश’ नावाचा तीन पानी जुगार खेळताना संशयित सापडले.

पोलिसांनी जुगाराचे साहित्य (प्लास्टिकचे कॉईन, पत्ते), रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल, सहा आलिशान गाड्या असा एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड तपास करत आहेत.

यांना केली अटक

विशाल रामदास काळे, अक्षय मानसिंग मोहिते, इम्रान सलीम शेख, अक्षय शंकर शेडगे, जहूर सल्लाउद्दीन अन्सारी, रंगनाथ कारभारी औटी, बजरंग शामलाल गुप्ता, महादेवन आर. के. (सर्व रा. नवी मुंबई), अजित राजकुमार पंचवाणी (उल्हासनगर), अकबर शफी हुसेन, मुकेश सत्यनारायण यादव (मुंबई), गुरुदेव भीमराव जाधव (सर्व रा. मुंबई), नावेद जिगर मेमन (मुंब्रा, ठाणे), जितेंद्र उत्तम परदेशी (दिघी, पुणे), रवी बिपीन सोनपाल (नाशिक), रमणलाखन यादव (उलवे, रायगड), हरिओम कुमार रामबिरसिंग, आकाश भगवती प्रसाद (दोघे रा. वांद्रे, मुंबई), रंजन गायसी, चंदा मगर, मिनुका मोहरजन (सर्व रा. पणजी, गोवा), हनुमंत एकनाथ थोरबोले (बंगला मालक, वरसोली, ता. मावळ).

Web Title : लोनावाला में हाई-प्रोफाइल जुआ अड्डे पर छापा; 22 गिरफ्तार

Web Summary : लोनावाला में पुलिस ने एक जुआ अड्डे पर छापा मारकर 22 लोगों को गिरफ्तार किया। पुलिस ने 49.64 लाख रुपये की नकदी, मोबाइल और लग्जरी कारें जब्त कीं। बंगला जुए के लिए किराए पर लिया गया था।

Web Title : Raid on Lonavala High-Profile Gambling Den; 22 Booked

Web Summary : Police raided a Lonavala gambling den, arresting 22. They seized cash, phones, and luxury cars worth ₹49.64 lakh. The bungalow was rented for gambling activities.