Pune Crime : दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:58 IST2025-10-03T16:57:39+5:302025-10-03T16:58:56+5:30
- हुतात्मा बाबू गेनू चौकात त्या फुले खरेदी करत होत्या. त्या वेळी तेथे गर्दी होती. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र लांबवले.

Pune Crime : दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरी
पुणे : दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवल्याची घटना महात्मा फुले मंडई परिसरात घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला शिवाजीनगर गावठाण भागात राहायला आहेत.
त्या दसऱ्यानिमित्त महात्मा फुले मंडई परिसरात बुधवारी (दि. १) दुपारी दीडच्या सुमारास खरेदीसाठी आल्या हाेत्या. हुतात्मा बाबू गेनू चौकात त्या फुले खरेदी करत होत्या. त्या वेळी तेथे गर्दी होती. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र लांबवले. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस कर्मचारी गोंजारी पुढील तपास करत आहेत.