Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 19:38 IST2025-08-17T19:37:44+5:302025-08-17T19:38:33+5:30

आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले.

pune crime news Mandavgan Farata: Vadgaon Rasai One dies in beating over drinking alcohol | Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मांडवगण फराटा : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. अविनाश ऊर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मयताची पत्नी वंदना विशाल जावीर (रा. मराठी शाळेच्या मागे, वडगाव रासाई, ता. शिरूर, व्यवसाय शेतमजुरी) यांनी आरोपी राहुल दत्ता गावंडे (रा. पाटील मळा, वडगाव रासाई, ता. शिरूर) याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली.

शनिवारी, दि. १६ रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई गावाच्या हद्दीतील हॉटेल सृष्टी परमिट रूम व बियर बार समोरील अंबिका पान स्टॉलजवळ आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणात आरोपी राहुल याने अविनाश याला मारहाण केली. यामध्ये अविनाश ऊर्फ विशाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मृत्यू पावला.

या प्रकरणातील आरोपी राहुल गवांडे फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नकाते हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: pune crime news Mandavgan Farata: Vadgaon Rasai One dies in beating over drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.