पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 10:24 IST2025-03-26T10:13:57+5:302025-03-26T10:24:22+5:30
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक पकडण्यात आलेले ३६७४ कोटींचे ड्रग्जही पुणे पोलिसांकडून काही दिवसांमध्ये नष्ट केले जाणार

पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये ?
पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याचे कंबरडे मोडल्यानंतर पुणेपोलिसांकडून मंगळवारी (दि. २५) गांजा, एमडी इफेडीन, कोकेन, एलएसडी चरस, अफिम पॉपीस्ट्रॉ, हेरॉईन व गांजामिश्रित बंटा गोळी, असा अंदाजे ७ कोटी ७६ लाखांचे ७८८ किलो ९५४ ग्रॅम अमली पदार्थांचा मुद्देमाल रांजणगाव येथील महाराष्ट्र इन्व्हर्मेंट पॉवर लिमिटेड कंपनीच्या प्लांटमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
नाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाचे वजन व परीक्षण पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मुख्यालयात पोलिस मुख्यालयात ड्रग्ज डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, सदस्य उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सदस्य उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
नोकर भरतीत अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा
ही प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी, याकरिता सर्वनाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाच्या परीक्षणाकरिता एफएसएलकडील तज्ज्ञ तसेच राज्य उत्पादन शुल्क येथील अधिकारी पंच म्हणून नेमण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी तसेच सरकारी फोटोग्राफर/व्हिडीओग्राफरदेखील उपस्थित आहेत. यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक सुजित वाडेकर यांच्या यांच्या उपस्थितीत हे अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधार धुणे याचे शेवटचे लोकेशन व्हिएतनाम
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक पकडण्यात आलेले ३६७४ कोटींचे ड्रग्जही पुणे पोलिसांकडून काही दिवसांमध्ये नष्ट केले जाणार आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास सुरू असून, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संदीप धुणे याचे शेवटचे लोकेशन व्हिएतनाम देशात असल्याचेही माहितीही समोर आली आहे.