जुन्या वादातून दोन कुटुबीयांमध्ये हाणामारी; हडपसर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:05 IST2025-10-07T20:04:58+5:302025-10-07T20:05:15+5:30
याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या घटनेत दोन्ही बाजूंनी घातक शस्त्रांसह दगडांनी हल्ला करून जखमी करण्यात आले.

जुन्या वादातून दोन कुटुबीयांमध्ये हाणामारी; हडपसर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा दाखल
पुणे : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये एकमेकांना बेदम मारहाण झाल्याची घटना रविवारी सकाळी हडपसरमधील गोसावी वस्तीमध्ये घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या घटनेत दोन्ही बाजूंनी घातक शस्त्रांसह दगडांनी हल्ला करून जखमी करण्यात आले.
दीपक बाबाजी शेगर (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर शंकर शेगर, राहुल अर्जुन शेगर, किशोर शंकर शेगर, शत्रुघ्न अर्जुन शेगर, मनोज अर्जुन शेगर, स्वप्नील अर्जुन शेगर, नितीन सुभाष शेगर, ज्योती शेगर, संगीता शेगर, हिरकणबाई शेगर (सर्व रा. गोसावी वस्ती हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर राहुल अर्जुन शेगर (वय ३२, रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाबाजी शेगर, दीपक बाबाजी शेगर, प्रेम बाबाजी शेगर, करण बाबाजी शेगर, रोहन बाबाजी शिंदे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून रविवारी (५ ऑक्टोबार) सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही कुटुंब एकमेकांशी भिडले. यामध्ये अनेकजण जखमी झाले. अधिक तपास वानवडी पोलिस करीत आहेत.