शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
2
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
3
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
4
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
5
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
6
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
7
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
8
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
9
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
10
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
11
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
12
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
13
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
14
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
15
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
16
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
17
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
18
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
19
मायक्रोसॉफ्टची नोकरी गेली, रशियात रस्ता साफसफाई करतोय भारतीय इंजिनिअर; सॅलरी ऐकून थक्क व्हाल
20
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:20 IST

Pune Crime: एका १७ वर्षाच्या मुलाची हालहाल करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रजमध्ये चौघांनी मिळून अमनची हत्या केली. 

कामावर जात असल्याचे सांगून अमन घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी आलाच नाही. बेपत्ता झालेल्या १७ वर्षाच्या अमनसिंगचा पोलिसांनी शोध सुरू केला. त्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. अमनसिंगची चार जणांनी हत्या केल्याचे समोर आले. त्याची हत्या करण्यासाठी आरोपींनी इन्स्टाग्रामची मदत घेतली आणि कात्रज घाटात बोलवून हत्या केली. अमनसिंगची दगड आणि कोयत्याने हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे हादरले. 

अमनसिंग सुरेंद्रसिंग गच्चड असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी तो घरातून बाहेर पडला होता. घरीच न आल्याने आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 

अमनसिंगची हत्या कोणी केली?

पोलिसांनी अमनसिंग हत्या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चौघेही हत्या करून फरार झाले होते. बेळगावमधून प्रथमेश चिंदू अधळ (वय १९), नागेश बालाची ढबाले (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांचे वय १६ वर्षे आणि १७ वर्षे आहे. 

जुन्या वादातून अमनसिंगची हत्या 

अटक केलेल्या आरोपींनी मयत मुलावर आरोप केले आहेत. अमनसिंग हा खूप त्रास देत होता. जुन्या वादाचा बदला म्हणून त्याची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. आरोपींनी अमनची आधी हत्या केली. त्यानंतर पुरावा मिळू नये म्हणून त्याचा मृतदेह पुरला होता. 

इन्स्टाग्रामवरून टाकलं प्रेमाचं जाळ

आरोपींनी अमनसिंगला धडा शिकवण्यासाठी इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या अकाऊंटवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अमनसिंग हा पेंटर म्हणून काम करत होता. आरोपींनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याला मेसेज पाठवण्यास सुरू केली. त्याच्याशी ते मुलीच्या अकाऊंटवरून बोलत होते.  

आरोपींनी त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला भेटण्यासाठी बोलावलं. कात्रज घाटात ये असा मेसेज त्याला पाठवला. त्यानंतर २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता तो भेटण्यासाठी घरातून बाहेर पडला. कामावर चाललोय असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. 

आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी अमन पोहोचला. तिथे चारही आरोपी आधीच हजर होते. त्यांनी अमनसिंगवर हल्ला केला. तो बेशुद्ध पडला. त्यानंतर ते त्याला खेड-शिवापूर शिवारात घेऊन गेले. तिथे त्याला दगडाने ठेचले आणि कोयत्याने वार करत हत्या केली. त्यानंतर तिथेच त्यांनी त्याला पुरले.  पोलिसांनी सध्या ज्या मुलीच्या अकाऊंटचा वापर करण्यात आला आहे, तिचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि अमनसिंगच्या हत्या प्रकरणाचा छडा लावला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Teen lured via Instagram, murdered, body buried in ghat.

Web Summary : Aman Singh, 17, was murdered by four individuals after being lured to a ghat via a fake Instagram profile. The perpetrators used stones and a sickle, then buried the body to conceal the crime, stemming from an old dispute.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPuneपुणेPoliceपोलिसkatrajकात्रजDeathमृत्यूArrestअटक