शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:22 IST

अशा परिस्थितीत, निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर आणि बाजारावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याने चीनला मोठा झटका बसला आहे. पण...

अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. यामुळे जागतिक राजकारणात मोठा खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, या कारवाईच्या काही तास आधीच चीनच्या विशेष दूतांनी मादुरो यांनी  भेट घेतली होती. चीन हा अमेरिकेनंतर व्हेनेझुएलाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. अशा परिस्थितीत, निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर आणि बाजारावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याने चीनला मोठा झटका बसला आहे. 

याशिवाय, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेने, व्हेनेझुएलाच्या बाजारात अमेरिकन वस्तूंचाच पुरवठा होईल, अशी अटही ठेवली आहे. यामुळेही चीनला मोठा फटका बसणार आहे. यामुळे चीनच्या हातून एक मोठी बाजारपेठ निसटली आहे.

मात्र, या संकट काळातही चीनला एक संधी मिळताना दिसत आहे. खरे तर, तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प सरकार 'मुनरो डॉक्ट्रिन'चा (Monroe Doctrine) हवाला देत, लॅटिन अमेरिकेच्या एका भागावर आपला हक्क सांगत आहेत. जर अमेरिका वेनेझुएलावर अशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकते, तर मग चीनही याच तत्त्वाचा अवलंब करून तैवानवर आपला दावा अधिक बळकट करू शकतो. 

मुनरो डॉक्ट्रिन हे धोरण चर्चेत होते. गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे प्रकाशन केले होते. यात त्यांनी या धोरणाचा उल्लेख केला होता. या धोरणाच्या माध्यमाने अमेरिका, मोठ्या प्रमाणात संसाधने असणाऱ्या लॅटिन अमेरिकन देशांवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे चीनला तैवानबाबत बळ मिळाले आहे.

ट्रम्प प्रशासनाकडून वेनेझुएलावर चीन, रशिया, क्युबा आणि इराणशी संबंध तोडण्यासाठी सतत दबाव टाकला जात होता. चीनच्या वाढत्या गुंतवणुकीवरही ट्रम्प यांनी वारंवार आक्षेप घेतला होता. आता ग्रीनलँडवरही अमेरिकेने दावा केल्याने युरोपसह जागतिक तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या या विस्तारवादी धोरणामुळे चीनलाही बळ मिळाले आहे. यामुळे आता सुरक्षितता आणि 'एकात्मिक चीन'च्या नावावर, तैवानवर हल्ला करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Venezuela action opens China's path, Taiwan tension rises?

Web Summary : US action in Venezuela, seizing Maduro, impacts China's trade and market access. Experts suggest this emboldens China to assert claims on Taiwan, mirroring the 'Monroe Doctrine'. Tensions escalate over US expansionist policies and China's potential actions.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाchinaचीन