शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुणे शहरात एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; उत्तमनगर पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:34 IST

- ८.१९ ग्रॅम एमडी जप्त; लाखोंची उलाढाल उघड; ८ पैकी ४ जण अटकेत

पुणे : शहरातील अमलीपदार्थांच्या वाढत्या विळख्यात आणखी एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून, उत्तमनगर पोलिसांनी एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या व १४ गुन्हे दाखल असलेल्या सराईतासह त्याच्या साथीदारांना उत्तमनगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

या मुलीचे अपहरण करणाऱ्याकडे केलेल्या झडतीत त्याच्याकडून २ एमडीच्या पुड्या सापडल्याने हे मोठे ड्रग रॅकेट उघड झाले आहे. ड्रग्ज विक्री करणारे तसेच ते घेणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांकडे आली आहे. सुनील गोपाळ राठोड ऊर्फ राठ्या राठोड (२८), राजन गोपाल नायर (३७), जतीन जयवंत कदम (२६, रा. वारजे) व शुभम संतोष दहिभाते (२८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. मुलगी प्रेम प्रकरणातून घरातून गेल्याचे समजले होते. गेल्या काही महिन्यांपासून या गुन्ह्यातील आरोपी राठ्या राठोड हा फरार होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्याकडून हद्दीतील सराईतांची परेड घेण्यात आली होती, तेव्हा त्यांनी हद्दीत काही बेकायदेशीर होत असेल तर कळवण्याचे सुचवले होते. त्यानंतर, पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, अपहरणाच्या गुन्ह्यातील राठ्या हा ड्रग्जमध्ये असून, तो अधून-मधून कोंढवे धावडे परिसरात येतो. त्याचवेळी पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

राठ्या राठोड याला कोंढवे धावडे येथे आल्यानंतर पकडले असता त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडून एमडीच्या पुड्या सापडल्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तपासात त्याने अनेक मुलांना ड्रग्ज विक्री केल्याचे तसेच तीन जणांकडून विकत घेतल्याचे समजले. ड्रग विक्रीसाठी केलेला ऑनलाइन व्यवहारही पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी ८.१९ ग्रॅम एमडी आणि दुचाकी असा २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२५० ते ३०० जणांकडून पैशांची देवाण-घेवाण...

राड्या राठोडच्या झडतीत ३ ग्रॅम एमडी व दोन मोबाइल जप्त करण्यात आले. पुढील तपासात मोबाइल व्यवहारातून सुमारे १० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले. तसेच २५० ते ३०० लोकांकडून पैशांची देवाणघेवाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपींनी एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून, शुभम दहिभाते, राजन नायर, जतिन कदम यांच्यासह इतर आरोपींचा सहभाग आढळला आहे. पुढील कारवाई करत पोलिसांनी शुभम दहिभाते याच्या घरातून ५.१९ ग्रॅम एमडी जप्त केले. आरोपींना न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश..

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, उपनिरीक्षक चेतन धनवडे, अक्षय पाटील, मुकेश कुरेवाड, पोलिस कर्मचारी प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, अनिरुद्ध गायकवाड आणि ज्ञानेश्वर तोडकर यांच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Bust MD Drug Racket; Arrest Kingpin and Accomplices

Web Summary : Pune police exposed an MD drug racket, arresting a wanted criminal and accomplices. The investigation revealed a network involving online transactions and hundreds of individuals, seizing MD worth ₹2.36 lakhs. Further investigation led to the discovery of more MD and financial transactions, with ongoing investigation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या