पुणे : एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा सहा लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या नवी मुंबईच्या आहेत. त्या ९ ऑक्टोबर रोजी सकाळी एसटी बसमधून निघाल्या होत्या. हडपसर भागातील मगरपट्टा सिटी ते वडगाव शेरी दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून दोन हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबवला. पिशवीतून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर पुढील तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबवले..
पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून एक लाख रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना बंडगार्डन रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पर्वती भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बंडगार्डन रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण पुढील तपास करत आहेत.
Web Summary : Thieves stole jewelry worth lakhs from women traveling on Pune buses. One incident occurred on an ST bus, another on a PMP bus. Police are investigating.
Web Summary : पुणे में बसों में यात्रा कर रही महिलाओं से चोरों ने लाखों रुपये के गहने चुरा लिए। एक घटना एसटी बस में हुई, दूसरी पीएमपी बस में। पुलिस जांच कर रही है।