पुणे : ‘मी धर्म गुरू आहे. त्यामुळे मला ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, भस्म, कुंकू, जप, माळ, धार्मिक पुस्तके अशा ११ पूजेचे साहित्य हवे आहे,’ अशी अजब मागणी महिलेवर लैंगिक अत्याचार केलेला आरोपी ऋषीकेश वैद्य याने न्यायालयाकडे केली, मात्र न्यायालयाने त्याला पूजेच्या वस्तू देण्यास नकार दिला आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच महादेवाचा अवतार असल्याची बतावणी करून भोंदूने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वैद्य याने पीडित महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख केल्यानंतर, मी महादेवाचा भक्त असून, महादेवाची उपासना कशी करायची हे तुला शिकवतो असे सांगून महिलेला आपल्या जाळ्यात खेचले होते.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. भोंदू वैद्य ऋषीकेश वैद्य याला पिंपरीवरून अटक करण्यात आली.
सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याने पोलिस कोठडीत असतानाच, मला पूजा करण्यासाठी साहित्य हवे आहे असा लष्कर येथील न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे वैद्य याला पोलिस कोठडीत नेमकी कोणती पूजा करायचीय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Web Summary : Accused of sexual assault, Rishikesh Vaidya, claiming to be a religious guru, bizarrely requested puja items from the court. The request was denied. Vaidya lured a woman online, promising to teach her Shiva worship before allegedly assaulting her. He is currently in police custody.
Web Summary : यौन उत्पीड़न के आरोपी ऋषिकेश वैद्य, जो धर्मगुरु होने का दावा करते हैं, ने अदालत से अजीब तरह से पूजा सामग्री मांगी। अनुरोध अस्वीकार कर दिया गया। वैद्य ने एक महिला को ऑनलाइन लुभाया, उसे शिव पूजा सिखाने का वादा किया और फिर कथित तौर पर हमला किया। वह फिलहाल पुलिस हिरासत में है।