शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime :नसरापूरमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:41 IST

नसरापूरसारख्या बाजारपेठेच्या गावात अशी घरफोडीची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथील जानकी मंगल कार्यालयाच्या मागील एका घरात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरफोडी केली. लोखंडी कपाटातील लॉकरमधून सुमारे ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.

फिर्यादी संतोष शंकर विंचूरकर (वय ३७, रा. नसरापूर) यांच्या मते, ते बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. चोरट्याने घराची मुख्य कडी आणि कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकर उघडून त्यातील सोन्याची कर्णफुले, वेल आणि अंगठी असा सुमारे एक तोळ्याचा ऐवज पळवला. विंचूरकर कुटुंबीयांनी घरी परतल्यावर चोरी आढळली आणि तात्काळ राजगड पोलिसांकडे फिर्याद दिली. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

चोरट्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक लोकांशी चर्चा आणि पथक कार्यवाही सुरू आहे. नसरापूरसारख्या बाजारपेठेच्या गावात अशी घरफोडीची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारच्या चोरी टाळण्यासाठी पोलिसांनी घरमालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विंचूरकर कुटुंबीयांसाठी सोन्याचे दागिने कौटुंबिक वारसा आहेत. राजगड पोलिस तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Burglary: Gold jewelry worth 70,000 stolen from locked house

Web Summary : Thieves broke into a house in Nasrapur, Pune, stealing gold jewelry worth ₹70,000. The incident occurred while the family was away. Rajgad police are investigating the burglary, urging residents to be vigilant.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या