Pune Crime : २० लाख दे, नाहीतर फोटो व्हायरल...! तरुणीचा पाठलाग करून धमकी देणारा आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:28 IST2026-03-25T18:28:02+5:302026-03-25T18:28:51+5:30

नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी केले गजाआड

Pune Crime Give me 20 lakhs otherwise the photo will go viral Accused who chased and threatened a young woman arrested | Pune Crime : २० लाख दे, नाहीतर फोटो व्हायरल...! तरुणीचा पाठलाग करून धमकी देणारा आरोपी अटकेत

Pune Crime : २० लाख दे, नाहीतर फोटो व्हायरल...! तरुणीचा पाठलाग करून धमकी देणारा आरोपी अटकेत

पुणे : तरुणीचा पाठलाग करून तिला २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करणाऱ्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजयसिंह संतोष गुंड (वय ३०, रा.मडेवडगाव, ढोकराई, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ डिसेंबर २०२५ ते २२ मार्च २०२६च्या दरम्यान सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि विजयसिंह गुंड हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विजयसिंह हा फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्याने तिच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने विजयसिंहने त्याच्यासोबत असलेले फिर्यादीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून खल्लास करेन, अशी धमकी दिली. तिच्या इच्छेविरुद्ध तिचा हात धरून स्वत:जवळ ओढले. सुरुवातीला तिने त्याच्या या धमकीकडे दुर्लक्ष केले.

पैसे न दिल्याने विजयसिंह याने गावाकडील एका ग्रुपवर तिचे अश्लील फोटो व्हायरल करून तिची बदनामी केली. ही बाब समजताच, या तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विजयसिंह गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. तरुणीची फिर्याद घेऊन विजयसिंह गुंड याला अटक केली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी करत आहेत.

Web Title : पुणे: अश्लील तस्वीरें वायरल करने की धमकी देने वाला आरोपी गिरफ्तार

Web Summary : पुणे में एक आदमी को एक महिला का पीछा करने, जबरन वसूली की मांग करने और पैसे न देने पर अश्लील तस्वीरें ऑनलाइन साझा करने की धमकी देने के आरोप में गिरफ्तार किया गया। विजय सिंह गुंड अब पुलिस हिरासत में है।

Web Title : Pune: Man Arrested for Extortion and Obscene Photo Threat

Web Summary : A man in Pune was arrested for stalking a woman, demanding extortion money, and threatening to share obscene photos online after she refused to pay. Vijay Singh Gund is now in police custody.