मुलीचा जबरदस्तीने हात ओढून विनयभंग; आरोपीस सशर्त जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:03 IST2025-09-02T18:03:08+5:302025-09-02T18:03:23+5:30
आरोपीने ॲड. जयपाल पाटील यांच्या वतीने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. राजगड पोलिस स्टेशन अंतर्गत आरोपी शेलार याच्यावर बीएनएस कलम 74, 78 आणि पाेक्सो 8 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

मुलीचा जबरदस्तीने हात ओढून विनयभंग; आरोपीस सशर्त जामीन
पुणे : मुलीचा जबरदस्तीने हात ओढून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायालयाने योग्य त्या अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला.
जीवन संजय शेलार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने ॲड. जयपाल पाटील यांच्या वतीने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. राजगड पोलिस स्टेशन अंतर्गत आरोपी शेलार याच्यावर बीएनएस कलम 74, 78 आणि पाेक्सो 8 नुसार गुन्हा दाखल झाला होता.
पीडितेने कोर्टासमोर आरोपीला जामिनावर सोडण्यास विरोध नसल्याचे लेखी म्हणणे कोर्टात सादर केले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. जामीन अर्जाचे कामकाज ॲड. जयपाल पाटील, ॲड. अमित आव्हाड आणि ॲड. सुखदेव सानप यांनी प्रत्यक्ष काम पाहिले.