येरवड्यात लूटमार करणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:59 IST2025-10-02T11:59:26+5:302025-10-02T11:59:44+5:30
येरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर एकाला मारहाण करुन त्याच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आल्याची घटना घडली होती.

येरवड्यात लूटमार करणारी टोळी गजाआड
पुणे : येरवडा परिसरात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. आकाश राजूसिंग बावरी (२८), सोनूसिंग दीपकसिंग बावरी (२०), जोगिंदरसिंग जग्गीसिंग बावरी (३८) आणि विनयसिंग विनोदसिंग बावरी (२९, चौघे रा. पोते वस्ती, लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर एकाला मारहाण करुन त्याच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आल्याची घटना घडली होती.
या गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिसांकडून करण्यात येत होता. आराेपी बावरी हे सराईत असून, ते गुन्हा केल्यानंतर परगावी पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अक्षय शिंदे आणि जायभाय यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.