Pune Crime : महामेट्रोच्या नावाने बनावट वेबसाईट;नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:05 IST2026-03-27T18:04:42+5:302026-03-27T18:05:40+5:30

या फसवणुकीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत महामेट्रो प्रशासनाने सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

Pune Crime Fake website in the name of Mahametro; Fraud scheme exposed with job lure | Pune Crime : महामेट्रोच्या नावाने बनावट वेबसाईट;नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड

Pune Crime : महामेट्रोच्या नावाने बनावट वेबसाईट;नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड

पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट वेबसाईट आणि फेसबुक पेज तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लक्ष्य करून भरतीच्या आमिषाने दिशाभूल होण्याची शक्यता आहे. या फसवणुकीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत महामेट्रो प्रशासनाने सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

महामेट्रोकडून पुणे, नागपूर आणि ठाणे येथे विविध मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असून, सर्व अधिकृत माहिती त्यांच्या संकेतस्थळावरूनच प्रसिद्ध केली जाते. मात्र, अलीकडेच अधिकृत संकेतस्थळाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करून त्यावर महामेट्रोचा लोगो वापरल्याचे निदर्शनास आले. या फसवणुकीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत महामेट्रो प्रशासनाने सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. बनावट वेबसाईट व सोशल मीडियावरील पेज तयार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पुणे, नागपूर आणि ठाणे येथील नोकरीसंदर्भातील सर्व अधिकृत जाहिराती केवळ त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केल्या जातात. इतर कोणत्याही वेबसाईट किंवा सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळाची खातरजमा करावी, अनोळखी लिंकवर क्लिक टाळावे आणि कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा शुल्क देण्यापूर्वी पूर्ण पडताळणी करावी, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.

Web Title : फर्जी महामेट्रो वेबसाइट का पर्दाफाश; नौकरी चाहने वाले झूठे वादों से ठगे गए।

Web Summary : महामेट्रो की नकली वेबसाइट नौकरी चाहने वालों को लुभाती है। अधिकारियों ने साइबर शिकायत दर्ज की। असली नौकरी विज्ञापन केवल आधिकारिक महामेट्रो वेबसाइट पर दिखते हैं। आवेदन करने से पहले सत्यापित करें।

Web Title : Fake MahaMetro website exposed; job seekers defrauded with false promises.

Web Summary : A fraudulent website mimicking MahaMetro lures job seekers. Authorities filed a cyber complaint. Genuine job postings appear only on the official MahaMetro website. Verify before applying.