Pune Crime: सोन्याची अंगठी, कपडे, भेटवस्तू दिल्या तरीही...; चिठ्ठी लिहिली अन् सराफ व्यावसायिकाने उचलल टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:36 IST2026-04-05T16:36:14+5:302026-04-05T16:36:56+5:30

- प्रतीक याचे फुरसुंगी येथे सोने-चांदीचे दुकान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची श्रेयाशी ओळख झाली होती.

Pune Crime Even though I was given a gold ring, clothes, and gifts A jeweler took the extreme step of writing a 12-page letter | Pune Crime: सोन्याची अंगठी, कपडे, भेटवस्तू दिल्या तरीही...; चिठ्ठी लिहिली अन् सराफ व्यावसायिकाने उचलल टोकाचं पाऊल

Pune Crime: सोन्याची अंगठी, कपडे, भेटवस्तू दिल्या तरीही...; चिठ्ठी लिहिली अन् सराफ व्यावसायिकाने उचलल टोकाचं पाऊल

पुणे : प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने तरुण सराफा व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल १२ पानी सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडली आहे. ही घटना ६ मार्च रोजी फुरसुंगी परिसरात घडली. प्रतीक राजेंद्र मेमाणे (वय २९, रा. फुरसुंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील राजेंद्र मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रेया दादासो खोपडे देशमुख (शिक्केकरी) (रा. आंबेड, भोर) हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२५ ते ६ मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक याचे फुरसुंगी येथे सोने-चांदीचे दुकान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची श्रेयाशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. श्रेयाने लग्नाचे आश्वासन देत प्रतीकला विश्वासात घेतले. प्रतीकने तिला सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, कपडे तसेच इतर भेटवस्तू दिल्या होत्या. दरम्यान, श्रेयाने स्वतःला कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून प्रतीकची सहानुभूती मिळवली. तरीही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार होता. मात्र, श्रेया सतत काही ना काही कारणे सांगून भेट टाळत होती. या प्रकारामुळे मानसिक तणाव वाढत गेला आणि अखेर प्रतीकने टोकाचे पाऊल उचलले.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या १२ पानी सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्यावर झालेल्या फसवणुकीबाबत सविस्तर उल्लेख केल्याची माहिती आहे. सुरुवातीला फुरसुंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आता श्रेयाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: प्यार में धोखा मिलने पर व्यवसायी ने दुकान में की आत्महत्या

Web Summary : पुणे में एक व्यवसायी ने कथित तौर पर शादी का वादा करने वाली महिला द्वारा धोखा दिए जाने के बाद आत्महत्या कर ली। उसने एक सुसाइड नोट छोड़ा जिसमें धोखाधड़ी का खुलासा किया गया, जिसके कारण महिला पर आत्महत्या के लिए उकसाने का आरोप लगाया गया।

Web Title : Pune Businessman Suicide: Deceived in Love, Ends Life in Shop

Web Summary : A Pune businessman committed suicide after alleged deception by a woman who promised marriage, then took gifts and avoided him. He left a suicide note detailing the fraud, leading to charges against the woman for abetment.