पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:04 IST2025-03-11T12:03:54+5:302025-03-11T12:04:59+5:30
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद
-किरण शिंदे
पुणे – पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने एका वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दशभुजा गणपती मंदिराजवळ संध्याकाळी घडलेल्या या अपघातात परशुराम वैश्यंपायम (८२) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते मंदिराजवळ उभे असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली व्यक्तीही जखमी झाली आहे.
जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पुण्यात वाढत्या अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.