Pune crime: दारूच्या नशेत तरुणांचा हैदोस; धारदार हत्याराने नऊ गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:46 IST2026-04-01T16:41:24+5:302026-04-01T16:46:10+5:30

- रस्त्यावर उभ्या असलेल्या ३ रिक्षा, २ टेम्पो आणि ४ चारचाकी गाड्या, अशा एकूण ९ वाहनांच्या काचा व खोपडी फोडून नुकसान केले.

Pune crime drunk youths vandalize nine vehicles with sharp weapons | Pune crime: दारूच्या नशेत तरुणांचा हैदोस; धारदार हत्याराने नऊ गाड्यांची तोडफोड

Pune crime: दारूच्या नशेत तरुणांचा हैदोस; धारदार हत्याराने नऊ गाड्यांची तोडफोड

पुणे : दारूच्या नशेत असलेल्या चार अल्पवयीन तरुणांनी हातात धारदार हत्यारे घेऊन ८ ते ९ वाहनांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) रात्री फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, यातील एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत एका २५ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. अल्पवयीन तरुणांनी दहशतीच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला पार्क या वाहनांची तोडफोड केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी (दि. ३१) रात्री पावणेदहाच्या सुमारास पापडे वस्तीतील क्रांती मित्र मंडळ गणेश मंदिर आणि संजुदा कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या या मुलांनी हातात शस्त्रे नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या ३ रिक्षा, २ टेम्पो आणि ४ चारचाकी गाड्या, अशा एकूण ९ वाहनांच्या काचा व खोपडी फोडून नुकसान केले.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणांवर आर्म ॲक्टसह इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तर घटनेनंतर पसार झालेल्या चार जणांपैकी एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

Web Title : पुणे: नशे में धुत युवाओं ने हथियारों से नौ वाहनों में तोड़फोड़ की

Web Summary : पुणे के फुरसुंगी में, चार नशे में धुत नाबालिगों ने हथियारों से नौ वाहनों में तोड़फोड़ की, जिससे दहशत फैल गई। पुलिस ने एक नाबालिग को गिरफ्तार किया और मामला दर्ज किया, खड़ी वाहनों को निशाना बनाने वाली विनाशकारी घटना के पीछे के मकसद की जांच कर रही है।

Web Title : Pune: Drunken Youths Vandalize Nine Vehicles with Weapons

Web Summary : In Pune's Phursungi, four intoxicated minors vandalized nine vehicles with weapons, causing panic. Police have arrested one minor and filed charges, investigating the motive behind the destructive act that targeted parked vehicles.