Pune Crime : बोरीपार्धीत पानटपरीवर अंमली पदार्थांचा साठा; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:03 IST2026-02-04T16:02:49+5:302026-02-04T16:03:16+5:30

या माहितीची खातरजमा करून शासकीय पंच, फॉरेन्सिक पथक, वजनकाटा धारक व फोटोग्राफर यांच्यासह छापा टाकण्यात आला.

Pune Crime Drug hoarding at a leafy shop in Boripardhi; One arrested | Pune Crime : बोरीपार्धीत पानटपरीवर अंमली पदार्थांचा साठा; एकास अटक

Pune Crime : बोरीपार्धीत पानटपरीवर अंमली पदार्थांचा साठा; एकास अटक

केडगाव : बोरीपार्धी (ता. दौंड) येथील बसस्टॉपजवळ कारभारी मिसळ शेजारील पानटपरीमध्ये गुंगीकारक व मानवी शरीरास अपायकारक अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून शासकीय पंच, फॉरेन्सिक पथक, वजनकाटा धारक व फोटोग्राफर यांच्यासह छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान पानटपरी चालक रमेश रामबली कुसवाह (रा. बोरीपार्धी) याच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीत आनंद मनुक्का नावाच्या गुंगीकारक, गांजामिश्रित बंटा गोळ्यांचे एकूण ०८ पॅकेट असा अंमली पदार्थाचा साठा आढळून आला. या पदार्थांचे एकूण वजन २.१६९ कि.ग्रॅ. असून, प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत या गोळ्यांमध्ये गुंगीकारक अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली.

बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी रमेश कुसवाह याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले यांच्यासह गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, रामदास जगताप, दत्ता काळे, विकास कापरे, प्रमोद गायकवाड, मारुती बाराते, प्रणव ननवरे, मोहन भानवसे, आदींच्या पथकाने केली.

Web Title : पुणे अपराध: बोरीपर्धी में पान की दुकान पर ड्रग्स जब्त; एक गिरफ्तार

Web Summary : पुलिस ने बोरीपर्धी में एक पान की दुकान पर छापा मारा, गांजा मिश्रित 'आनंद मनुक्का' गोलियों की बड़ी मात्रा जब्त की। दुकान मालिक रमेश कुसवाह को अवैध ड्रग्स रखने और बेचने के आरोप में एनडीपीएस एक्ट के तहत गिरफ्तार किया गया।

Web Title : Pune Crime: Drugs Seized at Pan Shop in Boripardhi; One Arrested

Web Summary : Police raided a pan shop in Boripardhi, seizing a large quantity of ganja-laced 'Anand Manukka' pills. The shop owner, Ramesh Kuswah, was arrested under the NDPS Act for illegal drug possession and sale.