ज्येष्ठाची दहा कोटींची फसवणूक करणारे सायबर चोरटे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:46 IST2026-03-03T10:45:50+5:302026-03-03T10:46:44+5:30

- 'डिजिटल अरेस्ट'ची दिली होती धमकी : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी

pune crime cyber thieves arrested for defrauding senior citizen of Rs 10 crore | ज्येष्ठाची दहा कोटींची फसवणूक करणारे सायबर चोरटे अटकेत

ज्येष्ठाची दहा कोटींची फसवणूक करणारे सायबर चोरटे अटकेत

पुणे : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. हर्षद सुभाष धनतोले (वय २३), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

आरोपी धनतोले, देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी केली होती. ब्लॅक मनी व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात सीबीआयकडून अटक (डिजिटल अरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती दाखवण्यात आली होती.

या प्रकरणात कुटुंबीयांनाही अटक करण्यात येणार असल्याचे सांगून आरोपींनी ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात दहा कोटी ७४ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


सीसीटीव्ही फुटेज तपासले

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ज्येष्ठ नागरिकाने ज्या बँक खात्यात पैसे भरले होते. त्या खात्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली, तसेच चोरट्यांनी शहरातील काही एटीएममधून पैसे काढले होते. पोलिसांनी संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सायबर पोलिसंच्या पथकाने तपास करून आरोपी धनतोले अणि देशमुख यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ७८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

४० लाख गोठवली

आरोपींच्या खात्यातील ४० लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक संगीता देवकाते, सहायक निरीक्षक अर्चना कटके, उपनिरीक्षक सुशील डमरे, अजित बढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : वरिष्ठ नागरिक को ठगने वाले साइबर चोर गिरफ्तार, करोड़ों की धोखाधड़ी

Web Summary : साइबर पुलिस ने एक वरिष्ठ नागरिक को डिजिटल गिरफ्तारी के नाम पर 1 करोड़ से अधिक रुपये की ठगी करने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया। आरोपियों ने सीबीआई अधिकारी बनकर गिरफ्तारी की धमकी दी और पैसे मांगे, जिसके बाद उनकी गिरफ्तारी हुई और कुछ धन बरामद हुआ।

Web Title : Cyber Thieves Arrested for Swindling Senior Citizen of Millions

Web Summary : Cyber police arrested two individuals for defrauding a senior citizen of over ₹10 million through digital arrest tactics. The accused impersonated CBI officers, threatening arrest and demanding money, which led to their capture and the recovery of some funds.