Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:17 IST2026-02-12T15:17:03+5:302026-02-12T15:17:21+5:30

३१ जानेवारी रोजी महाविद्यालयीन युवक आणि त्याचा मित्र पुणे स्टेशन परिसरातील एका पबमध्ये आले होते.

Pune Crime College youth's gold chain stolen from pub premises | Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी 

Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी 

पुणे :पुणे स्टेशन परिसरातील एका पबच्या आवारात कारमध्ये झोपलेल्या महाविद्यालयीन तरुणाकडील दीड लाखाची सोनसाखळी, तसेच त्याच्या मित्राकडील रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन युवकाने एका पबमधील बाउन्सरने चोरी केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे.

याप्रकरणी अनोळखी बाउन्सर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महाविद्यालयीन तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महाविद्यालयीन युवक बावधन भागात राहायला आहे. ३१ जानेवारी रोजी महाविद्यालयीन युवक आणि त्याचा मित्र पुणे स्टेशन परिसरातील एका पबमध्ये आले होते.

मध्यरात्री दोघेजण पबमधून बाहेर पडले. दोन जण कारने आले होते. पार्किंगमधील कारमध्ये दोघे झोपले. तक्रारदार तरुणाच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी आणि मित्राच्या खिशातून साडेसहा हजार रुपये आणि मोबाइल, असा एकूण मिळून एक लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. पार्किंगच्या परिसरात एका अनोळखी बाउन्सरने मुद्देमाल चोरून नेल्याचा संशय तरुणाने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मोरे करीत आहेत.

Web Title : पुणे: पब के पास युवक से सोने की चेन चोरी; बाउंसर पर शक।

Web Summary : पुणे में एक पब के पास एक कॉलेज छात्र की सोने की चेन (₹1.5 लाख) और उसके दोस्त के नकदी चोरी हो गई। एक बाउंसर पर संदेह है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Gold chain stolen from youth near pub; suspect bouncer.

Web Summary : A college student's gold chain (₹1.5L) and his friend's cash were stolen near a Pune pub. Suspicion falls on a bouncer. Police are investigating.