Pune Crime : येरवड्यात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटात राडा, तुफान हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:19 IST2026-03-25T18:19:05+5:302026-03-25T18:19:18+5:30
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टोळके पसार झाले होते.

Pune Crime : येरवड्यात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटात राडा, तुफान हाणामारी
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना २३ मार्चला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास येरवड्यातील मांगीरबाबा चौकातील पोते वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी ११ जणांविरोधात लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई मंगेश पठारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजनुसार अन्य आरोपींची ओळख पटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोते वस्ती परिसरात असलेल्या दोन गटात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याच वादातून टोळक्याने पुन्हा २३ मार्चला एकमेकांना गाठले. हत्यारांसह दगड वीट, बांबूच्या मदतीने एकमेकांना मारहाण केली. तसेच शस्त्रे आणि बांबू हवेत फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टोळके पसार झाले होते.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिथुन सावंत करीत आहेत.