पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी (OSD) असल्याचे भासवून पुणे पोलिसांची दिशाभूल करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्री यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी (OSD) असल्याचे सांगत पुण्यातील परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला.आरोपीने एका प्रकरणातील तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचा आरोप करत, मी उपमुख्यमंत्र्यांचा OSD आहे असे सांगून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपायुक्तांनी तत्काळ त्याची शहानिशा केली. तपासाअंती संबंधित व्यक्ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करूनविश्रामबाग पोलीस चौकी येथे अटकेची कारवाई केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे सरकारी अधिकाऱ्यांची नावे वापरून फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Web Summary : A man impersonating an officer from Eknath Shinde's office was arrested in Pune for misleading police. The accused, Pradyumn Patil, pressured officers by falsely claiming to be Shinde's OSD. Police verified his identity and took action.
Web Summary : पुणे में एकनाथ शिंदे के कार्यालय का अधिकारी बताकर पुलिस को गुमराह करने वाले एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया। आरोपी प्रद्युम्न पाटिल ने खुद को शिंदे का ओएसडी बताकर अधिकारियों पर दबाव डाला। पुलिस ने पहचान सत्यापित कर कार्रवाई की।