स्वामी चिंचोली येथील लूटमार आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणे दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:03 IST2025-07-05T15:01:57+5:302025-07-05T15:03:23+5:30
- वारकऱ्याची लूट आणि अतिप्रसंग प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र (स्केच ) पुणे ग्रामीण पोलिसांकडून जारी करण्यात आले होते.

स्वामी चिंचोली येथील लूटमार आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणे दोघांना अटक
दौंड - स्वामी चिंचोली (ता.दौंड ) येथे गेल्या आठवड्यात एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि भाविकांना केलेल्या लुटमार प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली
असल्याची माहिती पुणे ग्रामीण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती लागता की काय यामुळे आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहे. रविवार (दि.६) रोजी या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गील हे हे अधिकृत माहिती देणार असल्याचे रमेश चोपडे यांनी स्पष्ट केले. दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतल्या असून यातील एक आरोपी अकलूज तर दुसरा आरोपी भिगवण परिसरातील आहे.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली होती त्यानुसार विशेषता पश्चिम महाराष्ट्रात हे पथक आरोपींच्या शोधात होते मात्र आज मध्यरात्रीच्या सुमारास या आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे. पुणे आणि परिसरातून काही भाविक पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. स्वामी चिंचोली येथे एका टपरीवर चहा पिण्यासाठी हे भाविक थांबले असता यावेळी दोन नराधम आले त्यांनी भाविकांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तसेच कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तर एका अल्पवयीन मुलीला फरफटत झाडीझुडपात नेऊन तीच्यावर बलात्कार केला होता. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती मात्र नराधमांना पोलिसांनी जेरबंद केले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
वारकऱ्यांचा एक टेम्पो सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.
त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. इतकच नाही तर याच वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पंढरपूरच्या वारी दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.