पुणे - नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका ४३ वर्षीय महिलेशी सुरवातीला भावनिक जवळीक साधत, नंतर लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवून त्याचे फोटो-व्हिडिओ गुपचूप काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुढे हेच फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून तब्बल २१ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली.ही घटना २०१९ ते जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा विश्वास संपादन केल्यानंतर नवऱ्यपासून घटस्फोट मिळून देत लग्न करण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर या महिलेच्या इच्छेविरुद्ध त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. या काळात नकळतपणे तिचे फोटो व व्हिडिओ काढून ठेवले गेले. त्यानंतर हे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात रोख रक्कम आणि दागिने उकळले. यामध्ये रोख १८ लाख रुपये, तसेच सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि दुचाकी असा २१ लाख ४५ हजाराचा ऐवज आरोपीने उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान सतत होणाऱ्या या क्षणाला कंटाळून ४३ वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी रोहित उत्तमराव लाडके (वय ३२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे..
Web Summary : A Pune man extorted ₹21 lakh from a married woman by promising divorce, faking marriage, taking intimate photos, and blackmailing her. He threatened to release the photos, taking cash, jewelry, phone and bike. Police are investigating the suspect.
Web Summary : पुणे में एक आदमी ने तलाक का वादा करके, शादी का नाटक करके और विवाहित महिला की अंतरंग तस्वीरें लेकर उसे ब्लैकमेल किया और 21 लाख रुपये वसूले। उसने तस्वीरें जारी करने की धमकी दी, नकदी, गहने, फोन और बाइक ले ली। पुलिस आरोपी की जांच कर रही है।