Pune Crime: बाथरूम साफ करण्यास नकार, सतरा वर्षीय मुलाच्या खुनाचा प्रयत्न;येरवड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:55 IST2025-06-13T12:54:56+5:302025-06-13T12:55:30+5:30

- पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील प्रकार

Pune Crime Attempted murder of 17-year-old boy for refusing to clean bathroom | Pune Crime: बाथरूम साफ करण्यास नकार, सतरा वर्षीय मुलाच्या खुनाचा प्रयत्न;येरवड्यातील घटना

Pune Crime: बाथरूम साफ करण्यास नकार, सतरा वर्षीय मुलाच्या खुनाचा प्रयत्न;येरवड्यातील घटना

पुणे : येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील पाच अल्पवयीन मुलांनी मिळून एका १७ वर्षीय मुलाला हाताने मारहाण केली. यानंतर टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४९, रा. चऱ्होली फाटा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बराक क्रमांक २ मध्ये १० जूनला सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवले जाते. यातील बराक क्रमांक २ मधील एका १७ वर्षीय मुलाने बाथरूम साफ करण्यास नकार दिला. या कारणावरून त्याचे इतर मुलांशी भांडणे झाली. तेव्हा पाच अल्पवयीन मुलांनी या मुलाला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने त्याचा गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार समजताच तेथील सुरक्षारक्षकाने या मुलाला वाचविले. येरवडा पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pune Crime Attempted murder of 17-year-old boy for refusing to clean bathroom