Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:41 IST2026-03-26T19:40:56+5:302026-03-26T19:41:10+5:30

जेसीबी कामाच्या वादातून रात्री उशिरा मारहाण; आरोपी फरार

pune crime attacked by coyote in Palasdev; Youth seriously injured, case registered with Indapur police | Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा

Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा

पळसदेव : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील शिंदेवस्ती परिसरात जेसीबी कामाच्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेत महेश बनसुडे हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बनसुडे यांच्या तक्रारीवरून जेसीबी मालक शरद गणपत काळे याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सोमवारी रात्री सावंत बनसुडे यांनी महेश बनसुडे यांना फोन करून शेतात जेसीबी लावल्याची माहिती दिली. मात्र, या कामाबाबत वसंत बनसुडे यांनी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने काम बंद करण्यात आल्याचे बोलणे सुरू होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जेसीबी मालक शरद काळे याने वाद घालत अपमानास्पद वक्तव्य केले. यानंतर रात्री सुमारे ११:२० वाजण्याच्या सुमारास शरद काळे याने चर्चा करायची असल्याचे सांगून महेश बनसुडे यांना घराबाहेर बोलावले. तेथे शिवीगाळ करत त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने वार केला. महेश यांनी तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्या कानामागे लागून ते जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी महेश बनसुडे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर आरोपी शरद काळे फरार झाला असून, पोलिस निरीक्षक नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फाळके पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: जेसीबी विवाद में युवक पर हंसिये से हमला, गंभीर रूप से घायल।

Web Summary : पुणे के पलसदेव में जेसीबी कार्य विवाद को लेकर एक युवक पर हंसिये से हमला किया गया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस ने जेसीबी मालिक के खिलाफ मामला दर्ज कर लिया है, जो फिलहाल फरार है। घायल युवक का स्थानीय अस्पताल में इलाज चल रहा है।

Web Title : Pune: Youth attacked with sickle over JCB dispute, seriously injured.

Web Summary : A youth in Palasdev, Pune, was seriously injured after being attacked with a sickle over a JCB work dispute. Police have registered a case against the JCB owner, who is currently absconding. The injured youth is receiving treatment at a local hospital.