शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीत उधार सिगारेटच्या वादातून थरार कोयत्याने हल्ला; वयोवृद्ध महिलेसह चारजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:43 IST

या प्रकरणी संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारजण जखमी झाले आहेत.

सांगवी : उधार सिगारेट न दिल्याच्या रागातून सुरू झालेला किरकोळ वाद थेट कोयत्याच्या हल्ल्यापर्यंत गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १९) बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली. या प्रकरणी संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारजण जखमी झाले आहेत.

प्रतीक सुनील जगताप (रा. सांगवी, ता. बारामती) यांनी याबाबत माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी बसस्थानकाजवळ फिर्यादी प्रतीक जगताप यांची पानटपरी आहे. आरोपी अभिषेक महादेव जगताप हा त्यांच्या टपरीवर उधार सिगारेट मागण्यासाठी गेला होता. सिगारेट न दिल्याने संतप्त झालेल्या अभिषेकने शिवीगाळ करत प्रतीकला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ही बाब फिर्यादीचा लहान भाऊ सार्थक जगताप याला समजताच दोघे भाऊ आरोपीचे वडील महादेव जगताप यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, महादेव जगताप, त्यांची पत्नी गीता जगताप आणि मुलगी काजल जगताप यांनी कोणतेही म्हणणे ऐकून न घेता शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण वाढल्याचा आवाज ऐकून फिर्यादीचे वडील सुनील जगताप भांडण सोडवण्यासाठी आले.

यावेळी आरोपी अभिषेक जगताप याने घरातून कोयता आणून सुनील जगताप यांच्या डोक्यात पाठीमागून वार केला. वडिलांना वाचवण्यासाठी सार्थक पुढे गेला असता त्याच्याही डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. बचाव करताना त्याच्या करंगळीला गंभीर जखम झाली.

दरम्यान, घटनास्थळी आलेल्या फिर्यादीच्या आजी उषा मानसिंग जगताप यांना गीता जगताप व काजल जगताप यांनी ढकलून दिल्याने त्या पडून जखमी झाल्या. या मारहाणीत सुनील जगताप, सार्थक जगताप आणि फिर्यादी प्रतीक जगताप जखमी झाले असून, त्यांना प्रथम सांगवी येथील आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी अभिषेक महादेव जगताप, महादेव विश्वनाथ जगताप, गीता महादेव जगताप आणि काजल महादेव जगताप (सर्व रा. सांगवी, ता. बारामती) यांच्याविरोधात माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati: Cigarette debt dispute escalates to assault, four injured.

Web Summary : A cigarette debt dispute in Baramati's Sangvi turned violent, resulting in four injuries. A family attacked another with a sickle after a cigarette request was denied. Police have registered a case and are investigating.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या