ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्री करणाऱ्या बॉलर पबवर कारवाई; मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:59 IST2025-08-16T19:59:01+5:302025-08-16T19:59:19+5:30

- दरवेळी सर्वसामान्यांतून, राजकीय मंडळींकडून आरडाओरड झाल्यानंतर एक्साईज विभागाकडून किरकोळ स्वरूपाची कारवाई

pune crime action taken against Bowler Pub for selling liquor on Dry Day; Case registered against manager | ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्री करणाऱ्या बॉलर पबवर कारवाई; मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल 

ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्री करणाऱ्या बॉलर पबवर कारवाई; मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल 

पुणे : ड्राय डे सुरू असताना देखील मध्यरात्रीनंतर पबमध्ये मद्याची विक्री सुरू असल्याने येरवडा पोलिसांनी कल्याणीनगर येथील बॉलर पबवर कारवाई केली. यावेळी मॅनेजर रेमंड फ्रान्सिस डिसोजा (४५, रा. राजहंस कॉलनी, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर किसन बाळसराफ (४२) यांनी फिर्याद दिली आहे.

१४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ नंतर ड्राय डे सुरू होतो. त्यामुळे एरवी दीड वाजेपर्यंत पब, रेस्टॉरंट, हॉटेल ला परवानगी असली तरी १५ ऑगस्ट रोजी ड्राय डे असल्याने १४ तारखेच्या मध्यरात्री १२ नंतर मद्याची विक्री करता येत नाही. असे असताना देखील बॉलर पबमध्ये मध्यरात्री १२ नंतर मद्यविक्री सुरू असून पबमध्ये असलेल्या ३०० ते ४०० ग्राहकांना खाद्यपदार्थ, मद्य व अन्य पेय सुविधा पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बॉलर पबवर कारवाई करत मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला.

बॉलर पबकडून सतत नियमांचे उल्लंघन...

बॉलर पबकडून यापूर्वी देखील अनेकदा विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बॉलचा मालक हेरंब शेळके याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. २८ ऑक्टोबर २०२४, २१ एप्रिल आणि १५ ऑगस्ट रोजी येरवडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वारंवार पोलिस प्रशासनाकडून समज देऊन, गुन्हा दाखल करूनही बॉलर पबकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने पब मालक, मॅनेजर हे पोलिसांनाही जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. 

एक्साईज विभागाचे वरातीमागून घोडे...

आजवर पुणे शहरात एक्साईज विभागाकडून अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबवर, बार चालकांवर कधीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. दरवेळी सर्वसामान्यांतून, राजकीय मंडळींकडून आरडाओरड झाल्यानंतर एक्साईज विभागाकडून किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जाते. बॉलर पब च्या मालकाचे राजकीय लोकांशी असलेल्या ओळखीमुळे पोलिस अथवा एक्साईज विभाग कठोर कारवाई करण्यासाठी घाबरतोय का? असा प्रश्न देखील परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: pune crime action taken against Bowler Pub for selling liquor on Dry Day; Case registered against manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.