Video : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; १० ते १५ जणांचा एकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:33 IST2025-07-03T13:32:44+5:302025-07-03T13:33:01+5:30

विद्यार्थी सध्या केएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कॉलेजच्या परिसरात घडली.

pune crime a violent clash broke out between college students; 10-15 people attacked one person to death | Video : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; १० ते १५ जणांचा एकावर प्राणघातक हल्ला

Video : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; १० ते १५ जणांचा एकावर प्राणघातक हल्ला

 पुणे - पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात निकाल पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.तब्बल १ ०  ते १ ५  जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून सात-आठ वेळा वार करण्यात आले. त्यामुळे त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.



अधिकच्या माहितीनुसार, सदर विद्यार्थी सध्या केएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कॉलेजच्या परिसरात घडली. याबाबत इरफान मोहम्मद हुसेन करणूल यांनी पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा कॉलेजच्या यादीत मित्राचे नाव आहे का, हे पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका विद्यार्थ्याने धक्का दिल्याने वाद झाला. वाद संपल्यानंतरदेखील दोघांमध्ये  शाब्दिक वाद सुरुच राहिला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने 10 ते 15 साथीदारांना बोलावून अचानक हल्ला केला. मारहाणीत रस्त्यावर पडलेला वासा उचलून विद्यार्थ्याच्या डोक्यावर सात-आठ वार करण्यात आले.

यादरम्यान, घटनेवेळी जवळच असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने प्रसंगावधान राखत वासा हिसकावून घेतल्यामुळे विद्यार्थ्याचा जीव वाचला. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने आपल्या मामाला फोन करून प्रकार सांगितला. मामाने धाव घेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. लष्कर पोलीस तपास करत आहेत.  

Web Title: pune crime a violent clash broke out between college students; 10-15 people attacked one person to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.