Pune Crime: वारजे चौकात वळण घेताना प्लास्टर शीट्सने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:48 IST2026-03-29T13:48:22+5:302026-03-29T13:48:36+5:30

अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शीट्स तातडीने बाहेर काढून दुसऱ्या ट्रकमध्ये हलवण्यात आल्या.

Pune Crime A truck loaded with plaster sheets overturned while turning at Warje Chowk; Fortunately, disaster was averted | Pune Crime: वारजे चौकात वळण घेताना प्लास्टर शीट्सने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने अनर्थ टळला

Pune Crime: वारजे चौकात वळण घेताना प्लास्टर शीट्सने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने अनर्थ टळला

शिवणे : वारजे सेवा रस्त्याकडून शिवणे–उत्तमनगरच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १२ बीएफ ०९७५) वारजे येथील स्व. आमदार रमेश वांजळे चौकात वळण घेताना शनिवारी (दि. २८) अचानक उलटला. हा चौक अत्यंत वर्दळीचा असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने त्या वेळी चौकात कोणतीही गर्दी नसल्याने कोणालाही इजा झाली नाही आणि जीवितहानी टळली.

अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शीट्स तातडीने बाहेर काढून दुसऱ्या ट्रकमध्ये हलवण्यात आल्या. दरम्यान, ऐन चौकात ट्रक उलटल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. क्रेनच्या मदतीने उलटलेला ट्रक बाजूला करण्यात आला आणि काही वेळातच वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा चौकातील वाहतूक व्यवस्थापन आणि मोठ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Web Title : वारजे चौराहे पर ट्रक दुर्घटना, यातायात बाधित; कोई घायल नहीं।

Web Summary : वारजे के व्यस्त रमेश वांजले चौक पर एक ट्रक पलट गया, जिससे यातायात बाधित हो गया। सौभाग्य से, कोई घायल नहीं हुआ। प्लास्टर ऑफ पेरिस की शीटें स्थानांतरित की गईं। अधिकारियों ने क्रेन का उपयोग करके तुरंत यातायात बहाल कर दिया। घटना बेहतर यातायात प्रबंधन की आवश्यकता को उजागर करती है।

Web Title : Truck accident at Warje intersection disrupts traffic; no injuries.

Web Summary : A truck overturned at Warje's busy Ramesh Wanjale Chowk, disrupting traffic. Fortunately, no one was injured. प्लास्टर of Paris sheets were transferred. Authorities quickly restored traffic flow using a crane. The incident highlights the need for better traffic management.