Pune Crime :पुण्याचा 'पुष्पा'..! शिवांजली विद्यानिकेतन शाळेच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची तोड करून चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:55 IST2026-03-15T13:54:57+5:302026-03-15T13:55:18+5:30

आळेफाटा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील शिवांजली विद्यानिकेतन, चाळकवाडी या विद्यालयाच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची अज्ञात चोरट्यांनी तोड करून चोरी ...

Pune Crime A sandalwood tree in the Shivanjali Vidyaniketan school premises was cut down and stolen. | Pune Crime :पुण्याचा 'पुष्पा'..! शिवांजली विद्यानिकेतन शाळेच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची तोड करून चोरी 

Pune Crime :पुण्याचा 'पुष्पा'..! शिवांजली विद्यानिकेतन शाळेच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची तोड करून चोरी 

आळेफाटा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील शिवांजली विद्यानिकेतन, चाळकवाडी या विद्यालयाच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची अज्ञात चोरट्यांनी तोड करून चोरी केल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विद्यालयाच्या आवारात काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोडून नेल्याचे शनिवारी सकाळी शाळा सुरू होताना कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. झाडाचे खोड तोडून नेण्यात आले असून, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. चंदनाच्या झाडाला बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

शाळा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली असून, संबंधित प्रशासन आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शाळा व परिसरातील मौल्यवान झाडांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title : पुणे: शिवांजलि स्कूल क्षेत्र से चंदन का पेड़ चोरी

Web Summary : जुन्नर के पिंपलवंडी में शिवांजलि विद्यानिकेतन स्कूल से चोरों ने चंदन का पेड़ चुरा लिया। घटना शुक्रवार रात को हुई, जिससे स्थानीय लोग स्तब्ध हैं। स्कूल प्रबंधन शिकायत दर्ज करा रहा है, और पुलिस चोरी की जांच कर रही है। स्थानीय लोगों ने कीमती पेड़ों के लिए सुरक्षा बढ़ाने की मांग की है।

Web Title : Pune: Sandalwood Tree Theft from Shivanjali School Area

Web Summary : Thieves stole a sandalwood tree from Shivanjali Vidyaniketan school in Pimplewandi, Junnar. The incident occurred Friday night, shocking locals. School management is filing a complaint, and police are investigating the theft. Locals demand increased security for valuable trees.