शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत भरतीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 09:36 IST

- आम आदमी पक्षाची गुन्हा दाखल करण्याची व एसआयटी चौकशीची मागणी

पुणे : महापालिकेने २०२२ मध्ये केलेल्या थेट सेवा भरतीच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, तसेच एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी केली.

महापालिकेच्या भरती घोटाळ्यात एक संघटित टोळी सामील होती. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक उमेदवाराकडून ४५ लाख रुपयांपर्यंतची खंडणी उकळण्यात आली. या टोळीने पुणे महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि बनावट सह्या वापरल्या.

या बनावट कागदपत्रांमुळे प्रशासनाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि बेरोजगार तरुणांचे भविष्य धोक्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करावी, या घोटाळ्यात पालिका अधिकारी किंवा कर्मचारी सामील असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मुख्य गुन्हेगारांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation recruitment scam: Crores embezzled, SIT probe demanded.

Web Summary : Aam Aadmi Party alleges massive corruption in Pune Municipal Corporation's 2022 recruitment. Candidates were allegedly extorted up to ₹45 lakhs with forged documents bearing senior officials' names. An SIT investigation and filing of criminal charges are demanded to protect unemployed youth.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMunicipal Corporationनगर पालिका