शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तिथे काय उणे! 'पादचारी दिन' साजरा करण्यात देशात ठरणार पहिले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 17:29 IST

पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली

पुणे: सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालिका लवकरच पादचारी दिन साजरा करणार असल्याची घोषणा आज (5 ऑक्टोबर) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी केली. देशात पुणे शहर (pune city) हे पादचारी दिन साजरा करणारे पहिले शहर असणार आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली. (Pedestrian Day in pune)

यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं सुजित पटवर्धन, हर्षद अभ्यंकर, प्रांजली देशपांडे, सूरज जयपूरकर, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह पथ, मेट्रो, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित घटकांकडून पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, याबद्दल मते जाणून घेतली गेली. 

शिवाय शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली. केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका