शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मुलाला जेवणाचा डबा घेऊन जाताना काळाचा घाला; पिकअपच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक मद्यधुंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 20:07 IST

धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले व दुचाकीचा चुराडा झाला. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपही उलटून पडली

खडकवासला: कामावर असलेल्या मुलाला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या वडीलांवर काळाने घाला घातला असून पोल्ट्री व्यावसायिकाच्या पिक अपने समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडीलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुंजाराम सुंदरराव मरकड (वय 65,रा. एस एन. पिंपळे यांचे फार्म हाऊस स्प्लेंडर कंट्री, मांडवी बुद्रुक ता.हवेली)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पुंजाराम मारकड हे आपल्या मुलासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जेवणाचा डबा घेऊन जात होते. मांडवी बुद्रुक येथील अरुंद पुलाजवळ अचानक भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले व दुचाकीचा चुराडा झाला. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपही उलटून पडली. यात मारकड यांचा जागीच मृत्यू झाला. नितेश गणेश पवार ( रा. भिमनगर, कोंढवे धावडे, उत्तम नगर, ता. हवेली) असे पिकप चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर व हवेली पोलीस स्टेशन अशा दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदर ठिकाण पुणे ग्रामीण हवेली पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय कोळी यांच्याकडून कारवाई सुरू आहे.

दरम्यान मयत पुंजाराम मारकड यांच्या मुलाने पोलीस पिकअप चालकाला वाचवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे मुलाने सांगितले. त्यामुळे चालकाची तातडीने वैद्यकीय तपासणी करून हवेली पोलीसांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Father dies in accident while taking lunch to son.

Web Summary : A father died near Pune after a pickup truck hit his bike while he was carrying lunch for his son. The driver may have been drunk. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईकhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसroad safetyरस्ते सुरक्षा