Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 08:56 IST2025-06-25T08:52:58+5:302025-06-25T08:56:46+5:30
Pramod Kondhare News: भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला

Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून कोंढरे यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौऱ्यात कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकारी यांना पाठीमागून धक्का दिला. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर कोंढणे यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल, असे अश्वासन एका पोलीस अधिकाऱ्याने दिले. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळले
कोंढरे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला "माझा कुठला ही प्रकाराचा धक्का लागला नाही", असे कोंढरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही" अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली.