Roller Skating Competition 2024: ६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी जिंकली १४ पदके
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 12:16 IST2024-12-22T12:15:13+5:302024-12-22T12:16:24+5:30
नऊ वयोगटापासून १८ च्या पुढील वयोगटाचे स्पर्धक सहभागी झाले होते

Roller Skating Competition 2024: ६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी जिंकली १४ पदके
पुणे : बंगळुरू येथे ५ ते ८ डिसेंबरदरम्यान झालेल्या ६२व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील दहा इनलाईन फ्री स्टाईल स्केटर खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना १४ पदके जिंकली.
पुण्यातील सर्वांत लहान स्केटर साची सिद्धार्थ शहा हिने मुलींच्या ९ ते ११ वयोगटात शानदार कामगिरी करताना दोन रौप्यपदकांची कमाई केली. जिनेश नानल आणि श्रेयसी जोशी यांनी दमदार कामगिरीच्या जोरावर वरिष्ठ गटात प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावली. त्यांनी स्पीड स्लॅलम आणि क्लासिक स्लॅलम गटात ही सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. भारतातील उत्कृष्ट फ्रीस्टाईल स्केटर म्हणून त्यांनी दर्जा मिळविला. स्वराली जोशी हिने स्पीड स्लॅलममध्ये सुवर्ण आणि क्लासिस स्लॅलममध्ये रौप्यपदक जिंकले.
पुण्यातील पदक विजेते
वयोगट ९ ते ११ मुली : साची शहा : २ रौप्य
वयोगट ११ ते १४ मुले : देवांश नवलक्खा : १ रौप्य
११ ते १४ मुली : सावनी माने : १ रौप्य, कनन ओसवाल : १ कांस्य
१४ ते १७ मुली : स्वराली जोशी : १ सुवर्ण, १ रौप्य
१४ ते १७ मुले : आर्येश होनराव : १ रौप्य
वरिष्ठ पुरुष : जिनेश नानल : २ सुवर्ण, अरहंत जोशी : १ रौप्य
वरिष्ठ महिला : श्रेयसी जोशी : २ सुवर्ण, कुहू खांडेकर : १ कांस्य