Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:30 IST2025-11-13T18:29:14+5:302025-11-13T18:30:00+5:30
- पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत

Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
पुणे - नवले पुलावर आज गुरुवारी (दि. १ ३ ) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे सात ते आठ वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन कंटेनरच्या दरम्यान एक कार अडकून पेट घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्या कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, अनेक जण जखमी झाले आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या अंदाज वर्तवला जात आहे.
नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू#pune#firepic.twitter.com/o937Etwd2k
— Lokmat (@lokmat) November 13, 2025
पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पोलिसांनी परिसरात वाहतूक वळवली असून, नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे. या अपघातात जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.