सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुरटी गावाच्या हद्दीत जय मल्हार ढाब्याजवळ भरधाव चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत झालेला युवकच गाडी चालवत होता. हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला असून याबाबत काल दि. १२ मे रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकच्या माहितीनुसार, या प्रकरणी डॉ. शुभम हरीभाऊ जगताप (वय २८, रा. धायरी, सिंहगड रोड, बेनकर वस्ती, रो हाउस नं. २४, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास, ह्युंदाई कंपनीची वेरणा कार (क्रमांक MH 12 TK 9217) मयुर जगताप यांच्या ताब्यात होती. गाडी अत्यंत वेगात चालवली जात असताना उजव्या बाजूचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली. या अपघातात मयुर जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे. फिर्यादीने आपल्या निवेदनात मृत व्यक्तीच अपघातास जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून, गुन्हा नोंद १२ मे २०२५ रोजी करण्यात आली.
भरधाव गाडीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू; वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:34 IST