पं. भीमसेन जोशी यांचा जन्मशताब्दी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:13+5:302021-02-05T05:17:13+5:30

पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ ...

Pt. Birth Centenary Celebration of Bhimsen Joshi | पं. भीमसेन जोशी यांचा जन्मशताब्दी सोहळा

पं. भीमसेन जोशी यांचा जन्मशताब्दी सोहळा

पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ व ७ फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सांगीतिक मैफलींबरोबर भीमसेनजींच्या आठवणींना उजाळादेखील देण्यात येणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. कार्यक्रम तीन सत्रांत होणार असून, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनास केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थितीत असतील. यानंतर सांगीतिक कार्यक्रम होईल.

प्रत्येक सत्रातील गायन-वादनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. अजॉय चक्रवर्ती, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहीद परवेज, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, पंडितजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी तसेच पंडितजींचा नातू विराज जोशी आदी कलाकार कला सादर करतील. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका घेणे अनिवार्य असेल.

Web Title: Pt. Birth Centenary Celebration of Bhimsen Joshi