शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

जमिनी लुटणाऱ्या गुंड, गुन्हेगारांना पोलिसांकडून संरक्षण; आमदार दिलीप मोहिते पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 8:07 PM

एमआयडीसीमुळे चाकण परिसराचा विकास झाला. मात्र, त्यासोबत येथे गरिबांच्या जमिनी लुबाडण्याचे, लुटण्याचे प्रकार वाढले.

पिंपरी : एमआयडीसीमुळे चाकण परिसराचा विकास झाला. मात्र, त्यासोबत येथे गरिबांच्या जमिनी लुबाडण्याचे, लुटण्याचे प्रकार वाढले. अशा व्यक्तिंना पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे. कंपन्यांमध्ये माथाडी तसेच कामगार संघटना स्थापन होऊ नये, यासाठी काही कंपन्यांनी चुकीच्या माणसांना जवळ केले. त्यांना पैसे देऊन मोठे केले. त्यामुळे त्यांनी टोळ्या निर्माण करून दहशत निर्माण केली. यातून गुंड पोसण्याचे काम होत आहे. परिणामी एमआयडीसी परिसरात गुंडगिरी वाढली, असा आरोपी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.

चाकण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महाळुंगे पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी, अंमलदार कक्ष, महिला कक्ष आणि व्यायामशाळेचे लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी (दि. १) झाले. त्यावेळी आमदार मोहिते पाटील बोलत होते.  आमदार मोहिते पाटील म्हणाले, चाकण, महाळुंगे परिसरात एमआयडीसी निर्माण झाल्यानंतर गुन्हेगारी वाढत गेली. माथाडीमुळे जर गुन्हेगारी वाढत असेल तर, माथाडी कायदाच नको. मात्र कामगारांना सुरक्षा हवी. कंपन्यांमधील स्क्रॅप खरेदीसाठी गुन्हेगारांच्या टाेळ्या तयार झाल्या आहेत. कंपनीचे स्क्रॅप मिळविण्यासाठी टोळीयुद्धही झाली आहेत. कंपन्याच याला जबाबदार आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांचे व्यवस्थापक भागीदारीमध्ये स्क्रॅपचा व्यवसाय करतात. आपल्या गोटातील माणसाला ठेका देण्याचे काम हे अधिकारी करतात. त्यातून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढते. 

माझ्यावर चुकीचे गुन्हे टाकले... चाकण येथे मराठा मोर्चाच्या वेळेस माझ्यावर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. जमिनीशी संबंधित व्यवहारांमध्ये गरिबांवर अत्याचार केला जात आहे. जमिनी व भूखंड लुबाडून, लुटून प्लॉटिंग केले जात आहे. यात काही पोलीस हे गुन्हगारांची साथ देतात. त्यांना पाठीशी घालतात, अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेषांतर करून पोलीस दलातील चुकीच्या बाबींना आळा घालावा, अशी अपेक्षा आमदार मोहिते पाटील यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस