शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा

By कमलाकर कांबळे | Published: April 27, 2024 7:30 PM

Shashikant Shinde Latest Update: एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल. दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांद शिंदे यांच्यासह तत्कालिन सचिव सुधीर तुंगार आणि इतर २३ संचालक अशा २५ जणांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी शिंदे यांच्यावर सुमारे दहा कोटींच्या कथित शौचालय घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल असून ते जामीनावर बाहेर आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती. हे ताजे असाताच शनिवारी असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शिदे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

किंबहुना सातारा लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या विरोधात वातावरण तापविण्यासाठी शनिवार-रविवारची सुटी हेरून हा गुन्हा दाखल केल्याी चर्चा बाजार समिती आवारात आहे.

एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील ४६६ गाळेधारकांना २००९ मध्ये वाढीव एमएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे. या गाळेधारकांना वाढीव एफएसआयसाठी प्रति चौरस फुटासाठी ६०० रुपयांचा दर तत्कालीन संचालक मंडळाने आकारला होता. रेडिरेकनरचा त्यावेळचा दर प्रति चौरस फूट ३०६६ रूपये असताना फक्त ६०० रूपये आकारल्याने शासनाचे ६२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका शशिकांत शिंदे यांच्यासह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे २४ संचालक आणि तत्कालीन सचिव सुधीर तुंगार अशा २३ जणांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ४०६, ४०९ आणि ४२० अन्वये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची २००९ पासून चौकशी सुरू होती. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

या २५ जणांवर झाला आहे गुन्हा दाखल

एमीएमसीच्या मसाला मार्केटमधील कथित एफएसआय घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह तत्कालिन संचालक नारायण काळे, विजय रामचंद्र देवतळे, भानुदास एकनाथ कोतकर, दत्तात्रेय रामचंद्र पाटील, प्रदीप गंगाराम खोपडे, प्रभू गोविंद पाटील, अशोक देवराम वाळूंज, शंकर लक्ष्मण पिंगळे, किर्ती अमतलाल राणा, जयेश वसनजी वोरा, साेन्याबापू जनार्दन भुजबळ, विलास दशरथ मारकड, बाळासाहेब हणमंतराव सोळसर, भीमकांत बाळाराम पाटील, पांडुरंग पुरुषोत्तम गणेश, विलास रंगरावजी महल्ले, संजय नारायण पानसरे, चित्रा दिंगबर लुंगारे, बेबीनंदा प्रभाकर रोहिणकर, जितेंद्र अंकुश देहाडे, चंद्रकांत रामदास पाटील, राजेश गंगारधरराव देशमुख व तत्कालिन सचिव सुधीर तुंगार यांचा समावेश आहे.

गुन्हा दाखल झालेले संचालक शरद पवार यांच्या गटातील असून त्या त्या जिल्ह्यात मोेठे राजकिय वजन आहे. यातील काही जण त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक लोकसभा निवडणुकीत प्रभाव टाकू शकतात. हे हेरून सत्ताधारी महायुतीने आता घाईघाईने हा गुन्हा केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीsatara-pcसाताराNCPराष्ट्रवादी काँग्रेस