शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम

By विश्वास मोरे | Published: May 09, 2024 11:16 PM

Ajit Pawar in Pune, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना उद्देशून अजितदादांनी विविध मुद्द्यांवर केलं मार्गदर्शन

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. नात्या-गोत्यांचा, जातीपातीचा विचार करू नका. गंमत- जंमत करण्याचा प्रयत्न कुणी करेल, तर खपवून घेतलं जाणार नाही. मी तुमचा बंदोबस्त करेन. इमानेइतबारे काम करायचे आहे. मॅच फिक्सिंग-मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत भरला. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील सभेत पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, "स्मार्ट सिटी, मेट्रोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला. मोदी हे विकासपुरुष आहेत. त्यांच्या धोरणामुळे आपली अर्थव्यवस्था चांगली झाली आहे  त्यामुळे राज्य, देशाच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. रोजगार,  गुंतवणूक,  उद्योजकता वाढीसाठी मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे. संविधान बदलण्याचा होणारा आरोप चुकीचा आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये संविधान दिन साजरा होत नव्हता. मात्र, आता होत आहे."

"विरोधीपक्षाचे दाखवायचे दात आणि प्रत्यक्ष दात वेगळे आहेत.  निवडणुका होणार नाहीत,  संविधान संपवले जाईल, असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे खोट्या- नाट्या प्रचाराला थारा देऊ नये.  मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी महायुती बरोबर गेलो आहे. पुण्याचा रिंग रोड, मुळशीचे पाणी दोन्ही शहरांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे," असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

आणि खुलासा केला!

पिंपरीतील एका कार्यक्रमात बारणे यांचे प्रतिस्पर्धी माजी महापौर संजोग वाघेरे अजित पवार यांच्या पाया पडले होते. हे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यावर पवार म्हणाले, "आमदार अण्णा बनसोडे यांच्या कुटुंबातील लग्न होते. त्या सोहळ्यास मी उपस्थित होतो. त्यावेळी विरोधी पक्षातील उमेदवार तिथे आले आणि मला भेटले, त्यांचे फोटो व्हायरल केले. गैरसमज पसरविला. मी एक सांगतो, ज्यांनी आपला साथ सोडली, तो आपला नाही. त्यामुळे कोणीही गडबड गडबडून जाऊ नये."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारmaval-pcमावळshrirang barneश्रीरंग बारणेsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटील