शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

भजन, भारुडाच्या ठेक्यावर प्रचार

By admin | Updated: February 19, 2017 04:29 IST

खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वाडा कडूस जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे या गटात प्रचार शिगेला

चासकमान : खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वाडा कडूस जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे या गटात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पदयात्रा, घरोघरी भेटी, महिलांचा प्रचार, घोषणाबाजीने प्रचारात रंगत येत आहे. यामुळे संपूर्ण गटातील जनतेचे या गटाकडे लक्ष लागले आहे. या गटामध्ये सर्व पक्षांनी येथे उमेदवार उभे केले असल्यामुळे प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, तसेच भजनी भारुडांद्वारे हायटेक प्रचार सुरू केला आहे. वाहनांवर ध्वनिवर्धक लावून वेगवेगळ्या गाण्याच्या गवळणीच्या ठेक्यावर भजनी भारुडांद्वारे प्रचार करण्यात येत आहे. तसेच चित्रफित असलेली गाडी चौकाचौकात उभी केली जात आहे. हायटेक प्रचार करूनही मात्र मतदार सांगतील तो उमेदवार निवडून देणार आहेत. महिला उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्या पतीराजाने प्रचारात आघाडी घेतली आहे. खेड तालुक्यातील विविध भजनी, भारुड पथकांनी पथके तयार करून रोजगार मिळविला आहे. या मतदारसंघात तीन नवख्या महिला उमेदवार असून या मतदारसंघात विकासकामांबद्दल पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या कामाचा आढावा मांडला जात आहे. सत्ताधारी पक्ष वेगळे लढत असल्याने एकमेकांवर आरोप करून वस्त्रहरण करू लागले आहेत, मात्र आपल्या गटातील करावयाची कामे आणि अपूर्ण कामे यांचा कोणाकडे लेखाजोखा नाही. प्रचाराला मिरवणुका काढून स्वत:ची हवा करत आहे. मात्र या भूलथापांना मतदार न भूलता डोळ्यासमोर चांगला उमेदवार निवडून देऊन मतदान करण्याची चर्चा आहे. नोटबंदीनंतर ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे. ही परिस्थिती बदलावी असे त्यांना वाटते.या निश्चितपणाने आपल्या मतदानातून मतदार जागा दाखवणार आहे. वाडा-कडूस गटात वाडा, कडूस, चास ही पश्चिम भागातील निमशहरी गावे आहेत, या गावांना अनेक वाड्या-वस्त्या आहेत. या तीन गावांच्याभोवती उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या गटात गेल्या पंधरा दिवसांपासून उमेदवार आपल्या पद्धतीने प्रचार करताना भजनी मंडळाची पथके सध्या आपल्या पद्धतीने विविध गाण्यांच्या ठेक्यावर आपल्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह पोहोचवताना प्रयत्न करीत आहे.