शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

झाडांवरील जाहिरातींना लगाम

By admin | Updated: August 2, 2015 04:37 IST

शहरातील झाडांवर खिळे ठोकून केलेल्या जाहिराती, सार्वजनिक स्वच्छतांच्या आतील आणि बाहेरील बाजूच्या भिंती, पीएमपीने नव्याने उभारलेले स्टिलचे बसथांबे, पीएमपीच्या बसवर बेसुमार

पुणे : शहरातील झाडांवर खिळे ठोकून केलेल्या जाहिराती, सार्वजनिक स्वच्छतांच्या आतील आणि बाहेरील बाजूच्या भिंती, पीएमपीने नव्याने उभारलेले स्टिलचे बसथांबे, पीएमपीच्या बसवर बेसुमार पद्धतीने लावल्या जात असलेल्या भित्ती पत्रकांमध्ये शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झाल्यानंतर उशिरा का होईना पण जागे झालेल्या महापालिकेने या अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही जाहिरातबाजी करण्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांच्यावर थेट शहर विद्रूपीकरणा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश शनिवारी दिली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या संदर्भात महापौर धनकवडे म्हणाले, की शहरात सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातींची भित्तिपत्रके लावण्यात आले आहेत. त्यात दवाखान्यांपासून, खासगी शिकवण्या, नोकरीविषयक जाहिरातींचा समावेश आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शहराचे विद्रूपीकरण होत आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक शौचालये, शासकीय आणि निमशासकीय खासगी इमारती, महापालिकांच्या इमारतींच्या भिंती, बसगाड्या, बसस्टॉपवर अनेक भित्तिपत्रके लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. तसेच महापालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसानही होत असल्याने प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या भित्तिपत्रक लावणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे धनकवडे म्हणाले.