मंडपाच्या परवानगीविनाच कार्यक्रम

By Admin | Updated: August 22, 2015 02:18 IST2015-08-22T02:18:36+5:302015-08-22T02:18:36+5:30

गणेशोत्सव, दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंडप, स्वागत कक्ष, कमानी व स्टेज टाकण्यासाठी महापालिका तसेच पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. अन्यथा

The program without permission of the mandapa | मंडपाच्या परवानगीविनाच कार्यक्रम

मंडपाच्या परवानगीविनाच कार्यक्रम

हणमंत पाटील, पुणे
गणेशोत्सव, दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंडप, स्वागत कक्ष, कमानी व स्टेज टाकण्यासाठी महापालिका तसेच पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. अन्यथा, संबंधितांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जातात. मात्र, महापालिकेतर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे मंडप व स्टेज टाकण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नसल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार अशी महापालिकेची स्थिती आहे.
शहरातील विविध कार्यक्रमांसाठी मांडव व कमानी सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येतात. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून संबंधित अर्जदारांना परवानगी दिली जाते. कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे जाहिरात, कमान व रनिंग मंडपावर स्थानिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे कारवाई केली जाते. मात्र, गेल्या वर्षी कारवाईतून आठ हजार रुपयांचा दंड जमा झाला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सवाचे मंडप टाकण्यासाठी न्यायालयाने बंदीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, विविध गणेश मंडळांनी सभा घेऊन त्यावर चर्चा केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन नियमावलीची मागणी केली होती. त्यावर गणेशोत्सवामध्ये कोणतेही विघ्न येऊ देणार नसल्याची घोषणा मुख्यमंंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. महापालिकेच्या भवन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या काळात पालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी कोणतीही पोलीस परवानगी घेण्यात आलेली नाही, अशी माहिती नगरसेवक बाळासाहेब बोडके व हृषीकेश बालगुडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: The program without permission of the mandapa