शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

नेहमीइतकेच पाणी मिळूनही अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 03:06 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.

पुणे : पाटबंधारे खात्याने १ हजार १५० एमएलडी दररोज, असा इशारा दिला असला तरी सध्याही महापालिका खडकवासला धरणातून रोज त्यापेक्षा जास्त म्हणजे १२७० एमएलडी पाणी उचलत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.खडकवासला धरणातून १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत महापालिका रोज १ हजार ५७४ एमएलडी पाणी घेत होती. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून आजपर्यंत दररोज १ हजार २७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. तरीही पाणी कमी पडत आहे. पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी मिळेल, असे लेखी कळवले तर आहेच. शिवाय त्यापेक्षा जास्त पाणी उचलले तर पुन्हा पंप बंदची कारवाई करण्याची तंबीही दिली आहे. त्यामुळेच महापालिकेने पाणी नियोजनाच्या नावाखाली आताच कपात सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचे वितरण कागदोपत्री बरोबर असले तरीही पाणी टंचाई होते याची अनेक कारणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून सांगितली जातात. शहरातंर्गत असलेली सर्व वितरण व्यवस्था जुनी झाली आहे. सलग पाणी सोडले गेले तर फारशी अडचण होत नाही, मात्र पाणी सोडणे थांबवले तर पाईपलाईन रिकामी होते. त्यात हवा भरली जाते. त्यानंतर पाणी सोडले की पाईप फुटतात. दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा सर्व यंत्रणा नीट होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो, असे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारपुण्याची अधिकृत लोकसंख्या, उद्योग तसेच ग्रामपंचायती यांना द्यावे लागणारे पाणी, अशी सर्व सांख्यिकी माहिती सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचा कोटा वाढवून मागणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.मात्र, महापालिकेने काही वर्षांपूर्वीच असा प्रस्ताव दिलेला असून त्याकडे सरकारी स्तरावर पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे