Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 03:24 PM2022-12-16T15:24:47+5:302022-12-16T15:25:22+5:30

'परीक्षा पे चर्चा’ अंतर्गतच देशपातळीवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

Prime Minister Narendra Modi will interact with the students on the topic Pariksha Pe Charcha | Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

googlenewsNext

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर ‘परीक्षा मे चर्चा’ या विषयावर संवाद साधणार आहेत. त्या अंतर्गतच देशपातळीवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राजेश पाटील यांनी केले आहे.

या कार्यक्रमात सहभागा होण्यासाठी दि.३० डिसेेंबरपर्यंत नाव-नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. नाव-नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात थेट आणि ऑनलाइनद्वारे सहभागी होता येणार असून विद्यार्थी व पालकांना पंतप्रधान मोदी यांना प्रश्नही विचारता येणार आहे. या कार्यक्रमांतर्गतच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी राज्यातील अनुदानित शाळा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा, राज्यातील इतर बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांचे विद्यार्थी, शिक्षक पालक सहभागी होऊ शकरणार आहेत.

निबंधाचे विषय असे

१) विद्यार्थ्यांसाठी : आमचे स्वातंत्र्य सैनिक, आमची संस्कृती व आमचा अभिमान, माझे प्रेरणादायी पुस्तक, पुढील पिढीसाठी पर्यावरण संरक्षण, माझे जीवन माझे आरोग्य, माने नावीन्यपूर्ण व्यावसायिक बनविण्याचे स्वप्न, चौकटीबाहेरचे शिक्षण, शाळेत शिकण्यासाठी खेळणी आणि खेळ.
२) शिक्षकांसाठी : आमचा वारसा, अध्ययनपूरक वातावरण, कौशल्याधारित शिक्षण, अभ्यासक्रमाचे ओझे, भयमुक्त परीक्षा, शिक्षणातील भविष्यकालीन आव्हाने.
३) पालकांसाठी : माझे मुल, माझे शिक्षक, पौढ शिक्षण, सर्वांना साक्षर बनविते, सर्व शिका आणि पुढे जा असे विषय दिलेले आहेत.

''निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी https://innovateindia.mygov.in/ या वेबसाइटवर जास्तीतजास्त जणांनी नोंदणी करावी. - राजेश पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक'' 

Web Title: Prime Minister Narendra Modi will interact with the students on the topic Pariksha Pe Charcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.